ईश्वर ही एक फोल कल्पना आहे, किंवा ईश्वर असलाच तर त्याला प्रार्थना आवडत नाही, देवळे आवडत नाहीत, आणि प्रार्थना करणारांना तो शिक्षा करतो. तेव्हा निदान देवळे बांधण्यात पैशाचा अपव्यय करू नये

ईश्वराचे अस्तित्व मानण्याची जरुरीही समंजस लोकांना दिसत नाही आणि तो मानणे सयुक्तिकही दिसत नाही आणि सामान्यतः लोक जे गुण ईश्वरामध्ये आहेत असे मानतात, ते परस्परविरोधी आहेत, हे मागील लेखात दाखवले. ही अडचण टाळण्याकरता धार्मिक लोक सांगतात की, ईश्वराच्या कृत्यांवरून त्यांच्या गुणांचे अनुमान करता नये, कारण ईश्वराची करणी अगाध आहे. पण असे म्हटल्यास ईश्वराचे गुणवर्णन करण्याचाही हक्क राहत नाही.......